बातम्या

महिलांसाठी सुवर्णसंधी;१५ लाखांचे कर्ज… तेही बिनव्याजी!

शिक्षण भरपूर झालं आहे, अनुभव पण गाठीशी आहे आणि स्वतःच असं काहीतरी करायच आहे पण पैश्यांकडून नडतंय का? तरी आता टेंशन घेऊ नका. कारण महाराष्ट्र शासन घेऊन आलंय तुमच्यासाठी आई नावाची एक भन्नाट योजना.

ज्या महिलांना स्वतःच असं काही करायच आहे जस कीं,तुम्हाला कृषी पर्यटन सुरू करायचं असेल, होमस्टे उभारायचा असेल, स्थानिक खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचा असेल, छोटं हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटन गाडी किंवा गाईड सेवा सुरू करायची असेल… अशा पर्यटनाशी संबंधित अनेक व्यवसायांसाठी आई ही योजना मदतीचा हात देते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे, वय किमान १८ वर्षे असणे आणि व्यवसाय पर्यटन क्षेत्राशी संबंधित असणे आवश्यक आहे.””स्वप्न मोठं असेल तर भांडवलाची चिंता करू नका… कारण ‘आई’ योजना महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा देण्यासाठी सज्ज आहे. तुमच्याही मनात पर्यटन व्यवसायाचं स्वप्न असेल, तर ही संधी नक्की जाणून घ्या आणि आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल टाका.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts