
धाराशिव : तब्बल वर्षभर चाललेल्या कायदेशीर लढाईमध्ये शेतकऱ्यांना यश आल आहे.खरीप २०२५ हंगामातील सोयाबीन पीकविमा प्रकरणाचा निकाल धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या बाजूने लागला आहे.लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील सात दिवसांत पीकविमा भरपाई जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो सोयाबीन उत्पादकांना सुमारे ३५० कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील हजारो नव्हे तर लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.
केंद्र सरकारच्या सेंट्रल टेक्निकल ॲडव्हायझर कमिटी (TAC) ने विमा कंपनीने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. तसेच राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा (STAC) निर्णय कायम ठेवत विमा रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास संबंधित विमा कंपनीवर दंडात्मक आणि प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.
या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील हजारो नव्हे तर लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.