
पुणे, दि 16 : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाला अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा दणका बसला आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील बी . जी. गोयल ॲण्ड कंपनी’ या मसाल्याच्या दुकानावर धाड टाकली आहे.हें दुकान केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सिया गोयला हिच्या वडिलांच असल्याची माहिती आहे.
दुकानातील हळद, तीळ आणि सोयाबीन हें निकृष्ट दर्जाचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. दुकानाकडे आवश्यक परवाना नाही.तसेच, लेबल्स च्या त्रुटी देखील आढळून आल्या आहेत.एफडीएने ४,१७२ किलो साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ₹८ लाख आहे.इतकेच नाही, तर पुढील आदेश मिळेपर्यंत दुकानाचा व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याची नोटीसही प्रशासनाने बजावली आहे.
दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.












