
दिल्ली, दि. 21: साल होत 1952. स्वतंत्र आंध्र राज्यासाठी एक निष्ठावान गांधींवादी उपोषणाला बसला होता. एक दोन दिवस नाही तर तब्बल 58 दिवस आंदोलन केलं. आणि त्यातच त्यांचे प्राण गेले ते होते पोट्टी श्रीरामुलू.
पोट्टी श्रीरामुलू यांनी स्वतंत्र आंध्रप्रदेश राज्यासाठी त्यांनी उपोषण केलं त्यातच त्यांचे प्राण गेले. जनता रस्त्यावर उतरली अन शेवटी सरकारला त्यांची मागणी मान्य करत स्वतंत्र आंध्र राज्याची स्थापना करावी लागली. काळ बदलला, व्यक्ती बदलली, मागणी बदलली सरकार सुद्धा बदललं मात्र सरकारची काम करण्याची पद्धत मात्र तीच आहे.
शिक्षणमंत्र्याच्या राजीनाम्यासाठी सुरु असलेलं सोनम वांगच्छुक यांचं उपोषण सरकारने गुंडाळण्याचा प्रयत्न केला. सोनम यांना उपोषण स्थळवरून उचलून नेलं. दोन वेगवेगळ्या घटना आहेत. मात्र सरकारची वागण्याची पद्धत एकच आहे. सरकारचे प्रतिनिधी चर्चेला का आले नाहीत. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न का केला गेला नाही. उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य नसतील तर कारण सांगा. कायद्याच्या चौकटीतं बसत नसतील तर त्या कश्या अयोग्य आहेत ते सांगा.
प्रत्येकवेळी कोणाचा तरी जीव जाण्याची किंवा जीव धोक्यात जाण्याची सरकार वाट पाहतंय का? तुम्हाला काय वाटतय ते आम्हाला कमेंट करून सांगा.












