Uncategorized

बेंगलोर मेट्रोने प्रवास करताना नियम मोडल्यास भरावा लागेल हजारो रुपयांचा दंड

बंगलोर, दि. 22 : बेंगलोरला जाताय आणि मेट्रोन प्रवास करताय तर बेंगलोर मेट्रोचे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर बेंगलोर मेट्रोत नियम तोडल्यास भरावा लागतील २० हजार रुपयांपर्यंत दंड.

केंद्र सरकारच्या ‘जन विश्वास कायदा २०२६’ अंतर्गत बेंगळुरू मेट्रोने नवीन दंड नियम लागू केले आहेत.मेट्रोचे बनावट पास किंवा तिकीट काढून त्याची विक्री केल्यास 20 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

दारू पिऊन प्रवास करणे, मोठ्या आवाजात गाणी किंवा व्हिडिओ लावणे, सार्वजनिक उपद्रव करणे, थुंकणे किंवा अश्लील वर्तन करणे यासाठी २,५०० रुपयांचा दंड ठोठावला जाईल.

मेट्रो ट्रॅकवर विनापरवाना प्रवेश करणे किंवा चालणे, तसेच मेट्रोच्या सेवेत अडथळा आणणे यासाठी २० ते २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल.

याशिवाय, मेट्रो परिसरात विनापरवाना निदर्शने किंवा पोस्टर्स लावल्यास १० हजार रुपये, तर सुरक्षित किंवा प्रतिबंधित भागात विनापरवाना प्रवेश केल्यास ५ हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.त्यामुळे बंगलोर ला गेलाय आणि मेट्रोन प्रवास करताय तर या नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा खिशाला चांगलीच कात्री लागू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts