पुणे

चासकमान धरणातून ३,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे : चासकमान धरण सध्या 94.29 टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी आज (२२ जुलै २०२६) सकाळी ९ वाजता भीमा नदीपात्रात ३,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

धरणातील आवक आणि पावसाच्या स्थितीनुसार हा विसर्ग कमी किंवा वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीतील पाण्याचे पंप, शेतीची अवजारे, साहित्य आणि जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन चासकमान पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता मो. ता. जाधवर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts