पुणे

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ- प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील

बारामती, दि. 22 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जंयतीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती कॅटलफिडस् प्रा. लि.च्यावतीने एमआयडीसी परिसरात बिरोबा मंदिर परिसरात वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी दिली आहे.

कार्यक्रमाच्याच्या प्रांरभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला एमआयडीसी कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, एमआयडीसी कार्यकारी अभियंता विजय पेटकर, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, बारामती कॅटल फीड्स चे संचालक सचिन माने, सरपंच काका वनवे तसेच बिरोबा मंदिर समितीचे विश्वस्त, ग्रामस्थ व बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रमोद काकडे, बारामती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, बारामती इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्यासह बारामती औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते.

यावेळी एमआयडीसी परिसरातील विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकामध्ये अशोकाच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts