
मुंबई,दि.25 : पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र सुरूच असून, आज सकाळी १० वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. अचानक जाणवलेल्या या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पालघर जिल्ह्यात मागील काही काळापासून अधूनमधून सौम्य भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आजच्या धक्क्याची तीव्रता आणि केंद्रबिंदूची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
प्रशासन आणि संबंधित भूकंप निरीक्षण यंत्रणेकडून याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.









