
पुणे : भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकात वाढ झाली आहे. त्यामुळे पुरनियंत्रणाच्या दृष्टीने धरणाच्या सांडव्यावरून भामा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चासकमान पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (31 जुलै) सकाळी 7.30 वाजल्यापासून धरणातून सुरू असलेला 7,425 क्युसेक विसर्ग वाढवून 9,900 क्युसेक करण्यात येणार आहे.विभागाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार विसर्गात पुन्हा वाढ किंवा घट केली जाऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
भिमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे, जनावरे व शेतीसाहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन केले आहे.












