बातम्या

नागपुरात 16 जूनला होणार अभिजीत दिपके यांचे आंदोलन

नागपुरात 16 जूनला होणार अभिजीत दिपके यांचे आंदोलन
नागपूर : कॉक्रोच जनता पार्टीने १६ जून रोजी नागपुरात आंदोलनाची घोषणा केली आहे.”देशातील शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत नागपुरात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली आणि पुण्यानंतर आता उपराजधानी नागपुरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मात्र, या आंदोलनाला अद्याप पोलिस प्रशासनाची अधिकृत परवानगी मिळालेली नाही.”
“सूत्रांच्या माहितीनुसार, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून प्रशासनाकडून प्रस्तावाची छाननी सुरू आहे. अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच आंदोलनाची वेळ, ठिकाण आणि संपूर्ण रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.”
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे.पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून, १६ जूनच्या आंदोलनाला परवानगी मिळते की नाही, याकडे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.”

1 Comment

  1. Hi, this is a comment.
    To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
    Commenter avatars come from Gravatar.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts