महाराष्ट्र

ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी रमेश देहेडकर, सचिवपदी राजेश आर. जोशी यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी | जालना
जालना येथील ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी रमेश देहेडकर तर सचिवपदी राजेश आर. जोशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज (दि. २८ जून) झालेल्या सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.
यापूर्वीचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे आणि सचिव संतोष देशपांडे यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी रमेश देहेडकर आणि सचिवपदासाठी राजेश आर. जोशी यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून इंजिनिअर एस. एन. कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली, तर सहाय्यक म्हणून इंजिनिअर सुनील जोशी यांनी कामकाज पाहिले.
यावेळी माजी अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, डॉ. सुभाष भाले, ॲड. चंद्रशेखर देशपांडे, ॲड. बळवंत नाईक, प्रा. एस. व्ही. देशपांडे, प्राचार्य गणेश अग्निहोत्री, अभय कुलकर्णी, ॲड. संजय देशपांडे, संदीप बदनापूरकर, यशवंत बदनापूरकर, श्रीकांत शेलगावकर, वसंत देहेडकर, सीए चौबे, डॉ. संजय रुईखेडकर, ए. एम. देशपांडे, सूर्यकांत शिवनगिरीकर, भास्करराव डोणगावकर, रवींद्र देशपांडे, भारती नाईक, डॉ. पौर्णिमा रुईखेडकर, अलका हयातनगरकर, डॉ. चारुस्मिता हवालदार, डॉ. चारुदत्त हवालदार, डॉ. रवींद्र देशमुख, रसना देहेडकर, शोभाताई देशपांडे, सुनंदा बदनापूरकर, सुखदा देशपांडे, पवन कुलकर्णी, रवि जोशी यांच्यासह ब्राह्मण सभेचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सदस्यांनी अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts