देश विदेश

होमुर्झच्या सामुद्रधुनीत जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील अभियंत्याचा मृत्यू

पुणे,दि. 15 : इराण अमेरिका युद्धच्या झळा संपूर्ण जगाला बसताना दिसत आहेत. सध्या इराणकडून अमेरिकेचे मित्र असलेल्या आखातामधील देशांना लक्ष्य केले जात आहे. अशाच एका हल्ल्यात पुण्यातील एका अभियंत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.हेरंब करमरकर असं अभियंताचे नाव आहे.

ओमानच्या सागरी हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास या नौकेवर हल्ला झाला. नौकेवरील 24 पैकी 23 जणांची त्यानंतर सुटका करण्यात आली. मात्र, हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. रविवारी हल्ला होण्यापूर्वी त्यांचे पुण्यातील कुटुंबाशी बोलणे झाले होते. रविवारी रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी त्यांचं कुटुंबीयांसोबत शेवटचं बोलणं झालं होते. यानंतर मंगळवारी हेरंब यांच्या कंपनीकडून त्यांचे नातेवाईक रविंद्र टंडन यांना फोन करुन हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इराणकडून अमेरिकेवर हल्ला करणं शक्य नसल्याने इराण व्यापारी जहाज आणि अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांना लक्ष करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts