
दिल्ली, दि. 16 : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक हें 19 दिवसापासून उपोषणाला बसले आहेत.सलग उपोषण सुरु असल्याने दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढसाळत आहे. या उपोषणामुळे त्यांच्या वजनात 9 किलो घट झाली आहे.त्यांची प्रकृती खालावल्याने २४ तास वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
वांगचूक यांची खालावलेली प्रकृती पाहता, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखलकरण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने यावर गंभीर दखल घेत केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा पद्धतीमध्ये व्यापक सुधारणा करण्याची वांगचुक यांची प्रमुख मागणी आहे.आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, अनेक नेत्यांनी व दिग्गजांनी सोनम वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.












