Uncategorized

ड्रोन पेट्रोलिंग करणारे तामिळनाडू हे भारतातील पहिले राज्य ठरले

पुणे, दि. 21: भारतात महिलांवरील अत्याचारच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अश्या महिला अत्याचारच्या घटनांना लगाम घालण्यासाठी तामिळनाडू सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तमिळनाडू हे महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष ‘ड्रोन पेट्रोलिंग’ सुरू करणार आहे.

तमिळनाडू सरकारने महिला आणि मुलांच्या सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी विशेष ‘ड्रोन पेट्रोलिंग’ सुरू करणार आहे. असा उपक्रम राबणार तामिळनाडू भारतातील पहिलं राज्य ठरले आहे.सिंगाप्पेन स्पेशल फोर्स नावाच्या एका विशेष पोलीस दलाची स्थापना केली आहे आणि याच दलाच्या अंतर्गत ही हायटेक ड्रोन गस्त सुरू करण्यात आली आहे.

संवेदनशील भाग, गर्दीचे रस्ते, वाहतूक केंद्रे आणि बाजारपेठांवर ड्रोनद्वारे २४ तास नजर ठेवली जानार आहे.सिंगाप्पेन स्पेशल फोर्स ही महिला पोलिसांचा एक विशेष टास्क फोर्स आहे. जी महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी थेट मैदानावर आणि कंट्रोल रूममध्ये कार्यरत असणार आहे.या संपूर्ण सुरक्षा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी तमिळनाडू सरकारने ३५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ड्रोनद्वारे संशयास्पद हालचाली दिसल्यास, नियंत्रण कक्षाकडून जवळच्या गस्त घालणाऱ्या वाहनाला त्वरित माहिती दिली जाणार आहे. रात्रीच्या वेळी सुनसान असणारे रस्ते आणि निर्जन ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली असून गुन्हेगारांवर जरब बसली आहे.

तमिळनाडू पोलिसांचे हे पाऊल देशातील ‘स्मार्ट पोलिसिंग आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक आदर्श मॉडेल ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts