
दिल्ली, दि. 22 : दिल्ली मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचाराचार्जे विरोधात सर्वच स्थरातून केंद्र सरकारवर टीका होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या लाठीचार्जचा निषेध करत त्यांनी, “देशाच्या भविष्यावर लाठी चालवणारे हे राज्यकर्ते नक्की पाकिस्तानमधून आलेत का?” असा प्रश्न विचारत मोदी सरकारवर निशाणा साधला.
ठाकरे म्हणाले,”मी इथे राजकारण करायला किंवा भाषण द्यायला आलेलो नाही. देशासाठी लढणाऱ्या युवाशक्तीला सलाम करण्यासाठी आलो आहे,” असे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांना खंबीर पाठिंबा दिला.तसेच,एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. देशातील तरुणांचा विश्वासघात करणारे हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे.” असेही ठाकरे म्हणाले.












