टेक

आता फक्त ५ ते १० रुपयांत मिळेल हाय-स्पीड इंटरनेट

पुणे, दि. 22 : वर्क फ्रॉम होम आहे. पण इंटरनेट ला स्पीड नाही. किंवा ऑनलाईन क्लास आहेत पण इंटरनेट परवडत नाही. पण मी जर तुम्हांला सांगितलं “फक्त ५ ते १० रुपयांत हाय-स्पीड इंटरनेट मिळालं तर? हो हें खरं आहे.भारत सरकारच्या PM-WANI योजनेमुळे.

“PM-WANIया योजनेअंतर्गत देशभरात सार्वजनिक Wi-Fi हॉटस्पॉट उभारले जात आहेत, ज्यामुळे स्वस्त आणि वेगवान इंटरनेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे.PM-WANI म्हणजे Prime Minister Wi-Fi Access Network Interface.यामध्ये तुम्ही फक्त PM-WANI App डाउनलोड करा, मोबाईल नंबरने OTP द्वारे नोंदणी करा, जवळचा PM-WANI हॉटस्पॉट शोधा आणि तिथे असलेला QR Code स्कॅन करा. त्यानंतर तुमच्या गरजेनुसार प्लॅन निवडा, पेमेंट करा आणि काही सेकंदांत इंटरनेट सुरू.

या योजनेचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे किराणा दुकाने, चहाच्या टपऱ्या आणि लहान व्यावसायिक Public Data Office (PDO) म्हणून नोंदणी करून स्वतःचे Wi-Fi हॉटस्पॉट सुरू करू शकतात आणि त्यातून अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकतात.स्वस्त इंटरनेट आणि कमाईची संधी ही योजना देत आहे. तुमच्या परिसरात PM-WANI हॉटस्पॉट उपलब्ध आहे का, हे एकदा नक्की तपासा.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts