
पुणे, दि. 23 : जिओचे रिचार्ज महाग झाल्यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात जिओ सिमवर बंदी आणली आहे?काय आहे व्हायरल दाव्यातील सत्य? जिओ आणि इतर टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या रिचार्ज दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी आहे, मात्र सरकारने किंवा कोणत्याही प्राधिकरणाने जिओ सिम कार्डवर बंदी घातलेली नाही.
तामिळनाडूमध्ये रिलायन्स जिओ (Jio) सेवा अधिकृतपणे बंद करण्यात आलेली नाही किंवा त्यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारे असे सर्व दावे पूर्णपणे अफवा आणि खोटे आहेत.कोणत्याही राज्य सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना खाजगी टेलिकॉम कंपनीच्या सेवांवर थेट बंदी घालण्याचा कायदेशीर अधिकार नाही. हा अधिकार फक्त केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडे असतो.
रिचार्जचे प्लॅन्स महाग झाल्यामुळे संपूर्ण भारतासह तामिळनाडूमध्येही नागरिकांनी सोशल मीडियावर #BoycottJio असा ट्रेंड चालवला आहे.याद्वारे लोक आपला निषेध नोंदवत आहेत.तर बऱ्याचजणांनी महागड्या रिचार्जला कंटाळून तामिळनाडू आणि देशातील इतर भागांतील अनेक ग्राहक आपले सिम कार्ड सरकारी कंपनी असलेल्या BSNL मध्ये पोर्ट (Port-out) करत आहेत. यामुळे बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे थलपती विजय यांनी अंबनीला दणका दिला अल्टीमेटम दिला असे दावे पूर्णतः खोटे आहेत.