काँग्रेसने चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागायला पाहिजे : अमृता फडणीस

Oplus_16908288

मुंबई, दि. 5 : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ या शब्दाचा वापर केल्यावरुन काँग्रेसवर सडकून टिका होत आहे.यावर आता अमृता फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.काँग्रेसने चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागायला पाहिजे,’ असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.ग्रॅव्हिटस फाउंडेशन’तर्फे जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात अमृता फडणवीस बोलत होत्या.

तसेच, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांसारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने देशासाठी मोठे योगदान दिले. आजच्या काळातही अशा महिलांची गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने योगदान द्यायला हवे,’असेही फडणवीस म्हणाल्या.

Exit mobile version