इंस्टाग्रामने लाँच केले नवीन चार फिचर

Oplus_16908288

पुणे, दि. 17 : तुम्ही इंस्टाग्राम वापरताय तर तुम्हाला इंस्टाग्रामने लाँच केलेले हें नवीन चार फिचर माहिती असायलाच हवेत.इंस्टाग्रामने चार नवीन फिचर लाँच केले आहेत. त्यातील पहिलं म्हणजे तुम्हांला कोणत्याही रील किंवा पोस्टवर कमेंट बॉक्स मध्ये फोटो शेअर करता येना आहे. म्हणजे तुमच्या प्रतिक्रिया आता फक्त शब्दात नाही तर फोटोतही देता येणार आहेत.

दुसरे फीचर म्हणजे प्रोफाइल ग्रिड ॲडजस्ट करणे. आता तुम्हांला हवी ती पोस्ट हव्या त्या ठिकाणी बदलता येणार आहे. तिसरे फिचर म्हणजे इन्स्टंट्स’ फीचर. यात कोणतेही फिल्टर किंवा एडिटिंग न करता तुमचे रिअल-टाइम, नैसर्गिक क्षण लगेच शेअर करता येतील.

चौथ फिचर म्हणजे मल्टिपल कॅप्शन्स फॉर कॅरोसेल.आता प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओला स्वतंत्र कप्शन देता येणार आहेत.तुम्हांला यातील कोणतं फिचर सगळ्यात जास्त आवडल ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.

Exit mobile version