तुमचा फोन सापडत नाही आणि फोन जर सायलेंटवर आहे तर ही ट्रिक नक्की वापरा

Oplus_16908288

तुमचा फोन घरातच कुठेतरी पडला आहे? सापडत नाही आणि फोन सुद्धा सायलेंट वरती आहे. तर ही ट्रिक तुमच्यासाठी. फोन हरवला आणि तो सायलेंट मोडवर असेल, तर घाबरू नका. काही सेकंदांत तुम्ही तो मोठ्या आवाजात वाजवू शकता.

अँड्रॉइड युजर्ससाठी…

दुसऱ्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर Google Find My Device वेबसाइट उघडा. त्यानंतर हरवलेल्या फोनशी लिंक असलेल्या Gmail आयडीने लॉग इन करा. तुमच्या फोनवर क्लिक करा आणि “Play Sound” हा पर्याय निवडा. विशेष म्हणजे, फोन सायलेंटवर असला तरी तो तब्बल ५ मिनिटे फुल व्हॉल्यूमवर रिंग वाजवत राहील.

iPhone युजर्ससाठी…

दुसऱ्या iPhone किंवा iPad वर Find My ॲप उघडा. किंवा लॅपटॉपवर iCloud Find मध्ये Apple ID ने लॉग इन करा. तुमचे डिव्हाइस निवडा आणि “Play Sound” वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा iPhone मोठ्या आवाजात वाजू लागेल.म्हणून, फोन हरवला तरी घाईगडबड करू नका. Google किंवा Apple च्या या फीचरचा वापर करून काही मिनिटांत तुमचा फोन शोधण्याचा प्रयत्न करा.

Exit mobile version