टेकदेश विदेश

इसरोमध्ये नेमक चाललंय तरी काय? 100 हुन अधिक शास्त्रज्ञानी दिले राजीनामे

पुणे, दि. 18 : मागील काही महिन्यात ईसरोच्या 100 हुन अधिक शास्त्रज्ञानी आणि तज्ञांनी राजीनामे दिले आहेत. नेमक असं का घडलं? सरकारला त्यावर बंदी घालण्याची वेळ का आली. इसरोच्या अंतराळ मोहिमांना धक्का बसला आहे. कारण, एकापाठोपाठ एक शास्त्रज्ञानी राजीनामे दिले आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे खाजगी कंपण्या देत असलेले आकर्षक पगार,आधुनिक सुविधा आणि जागतिक स्तरावर काम करण्याची संधी.

अग्निकुल, स्कायरूटसारख्या खासगी स्पेस स्टार्टअप्स वेगाने वाढत असून, ते इस्रोच्या तुलनेत अधिक वेतन आणि करिअरच्या नव्या संधी देत आहेत. त्यामुळे अनेक अनुभवी वैज्ञानिक खासगी क्षेत्राकडे वळत आहेत.त्यामुळे सरकारने ग्रुप A’ वैज्ञानिकांचे राजीनामे आणि स्वेच्छानिवृत्तीचे (VRS) अर्ज थेट स्वीकारण्यावर बंदी घातली आहे. जेणेकरून भविष्यातील महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांवर मनुष्यबळाची कमतरता निर्माण होऊ नये.मात्र फक्त राजीनामे न स्वीकारून किंवा बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही.

याउलट वैज्ञानिकांना स्पर्धात्मक वेतन, आधुनिक संशोधन सुविधा आणि करिअरमध्ये अधिक संधी दिल्या तरच इस्रोतील प्रतिभावान शास्त्रज्ञ संस्थेत टिकून राहू शकतील.तुम्हांला काय वाटतय तते आम्हांला कमेंट करून नक्की सांगा.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts