
मुंबई, दि. 23 : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि हिंसाचारावर सगळीकडूनच टिका होत आहे. मात्र गीतकार, कवी मनोज मुंतशीर यांनी एका अलिकडील मुलाखतीत जंतर-मंतरवरील आंदोलकांना ‘देशद्रोही’ ठरवलंय आणि हे वक्तव्य त्यांनी ‘पूर्ण जबाबदारीनं’ केलंय, असंही त्यांनी सांगितलंय. पण, संगीतकारानं केलेल्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
मनोज मुंतशीर यांनी ‘टाइम्स नाऊ नवभारत’ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की, ते कधीही जंतर-मंतरवर जाणार नाहीत, कारण तिथे सध्या आंदोलकांशी संबंधित असलेल्या लोकांच्या बाजूला उभं राहण्याची त्यांची इच्छा नाही. ते म्हणाले की, “मी कधीही जंतर-मंतरवर जाणार नाही… मी जाणार नाही कारण जंतर-मंतरचं प्रतिनिधित्व करणारे लोक सध्या जे आहेत, ते दुर्दैवानं… अशा प्रकारचे लोक नाहीत, ज्यांच्यासोबत उभं राहणं मला सोयीचं किंवा योग्य वाटेल…
“कॉकरोच जनता पार्टी’बद्दल बोलताना ते म्हणाले की, “या देशातील तरुण ‘कॉकरोच जनता पार्टी’पेक्षा अधिक चांगल्या गोष्टीस पात्र आहेत. नीटचा पेपर फुटणं ही चांगली गोष्ट होती, असं जगात कोण म्हणेल? कोण असं म्हणेल? ती घटना चुकीचीच होती. जर एकाही विद्यार्थ्याचा जीव गेला असेल, तर त्यासाठी संपूर्ण यंत्रणा जबाबदार आहे…
“मुंतशीर पुढे म्हणाले,मी स्वतःही तिथली भाषणं ऐकतोय आणि तिथे येणाऱ्या लोकांचं निरीक्षण करतोय, असे लोक जे ‘भारताचे तुकडे केले जातील’, अशा घोषणा देतात आणि काश्मीर हा भारताचा भाग नाही असा दावा करतात… मी अत्यंत जबाबदारीच्या भावनेतून त्यांना देशद्रोही म्हणतोय… ते आपल्या प्रभू श्रीरामांचा उल्लेख केवळ ‘सीतेचा पती’ असा करतात… हे अत्यंत अपमानजनक आहे…