
दिल्ली, दि. 31 : राहुल गांधी हे सर्वात मोठे उपद्रवी असल्याची टीका करत केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला आहे.
राहुल गांधी यांनी गुरुवारी लोकसभेतील भाषणा दरम्यान विद्यार्थी, मूर्ख आणि अंधभक्त अशा शब्दांचा वापर केला. याचाच आधार घेत संसदीय मर्यादांचे उल्लंघन केल्याचा ठपका गांधींवर ठेवण्यात आला. नियम 352(ii), (iii) आणि (vii) दाखला देण्यात आला. विरोधी पक्ष नेत्याचे शब्द सभागृहाच्या पटलावरून हटवण्यात आले. आता अनुराग ठाकूर यांनी विशेष अधिकाराचे हनन झाल्याचा ठपका ठेवत राहुल गांधींविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे.
तसेच, लोकसभेतील भाजपचे मुख्य प्रतोद संजय जयस्वाल यांनीही लोकसभा अध्यक्षांना काँग्रेस नेत्याविरोधात कारवाईसाठी पत्र दिले आहे. हक्कभंगाचा प्रस्ताव आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.












