देश विदेश

अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे, दि. 1: देशाच्या सुरक्षेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात आयोजित सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

देशाच्या सुरक्षाविषयक धोरणांना बळकटी देण्यात आणि भारताचे सामरिक हित जपण्यात अजित डोवाल यांनी बजावलेल्या भूमिकेचा गौरव करत त्यांचा सन्मान करण्यात आला.टिळक स्मारक मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षी राष्ट्राच्या प्रगती, विकास आणि देशहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो.

यावर्षी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातील अजित डोवाल यांच्या दीर्घकालीन आणि महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts