जंतरमंतरवरती आंदोलना दरम्यान अपशब्द वापरणाऱ्या मुलांना मी माफ केलंय : प्रधानमंत्री मोदी

Oplus_16908288

दिल्ली,दि. 1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक इंस्टाग्रामवरती व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये ते जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनात काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केली, त्यांना विद्यार्थ्यांना माफ केल्याचे म्हंटल आहे.देश पुढं जातोय, मुलांनी पुढं जावं यासाठी सोबत येऊन काम करु, असं मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, हाय फ्रेंडस, माझ्या मनाला वाटतं फक्त तुमच्याशी बोलू, जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिलं आहे. काही खोडकर मुलांनी शिवीगाळ केली. कोणत्याही समाजाला शोभणार नाही, अशा शब्दांचा वापर केला गेला. मला शिव्या दिल्या, माझ्या स्वर्गीय आईला देखील शिव्या दिल्या. मात्र, मला आज बोलायचं आहे, लहान असताना चुका होतात, लहानपणात सुधारण्याची संधी असते,हेच लहानपणाचं लक्षण आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मी समाजात असलेला आक्रोश चांगल्या समजून घेऊ शकतो, हा सांस्कृतिक धक्का आहे. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशा बोलू शकतात हा प्रश्न आहे. मात्र, वेळ आहे, या मुलांची गळाभेट घेऊन त्यांना मार्ग दाखवण्याची गरज आहे. या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे, असं देखील मोदींनी म्हटलं.

नरेंद्र मोदी पुढं म्हणाले, मुलांना शिक्षा देणे, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं,समाजात त्यांना त्रास देणं, यातून आपण परिस्थिती बदलू शकत नाही. मला त्यांना माफ करायचं आहे. समाजानं माझी ही गोष्ट स्वीकारावी. कारण माझ्या मनात हीच भावना आहे. कारण, कधी कधी दातांमध्ये जीभ चावली जाते, रक्त येतं, त्यामुळं आपण दात तोडत नाही, कारण दात आपलेच, जीभ आपलीच असते.

Exit mobile version