राजकीय
राजकीयशिक्षण

नीट पेपरफुटीवरून सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर कडाडून टिका

मुंबई, दि. 1 : पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. NEET परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत कठोर कारवाईची मागणी केली आहे. “UPSC सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेचा पेपर कधीच फुटत नाही, मग NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर वारंवार कसे फुटतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पेपर फुटीमुळे प्रामाणिपने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे.

सुळे म्हणाल्या परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत आपण, आपला पक्ष आणि इंडिया आघाडी समाधानी नसून एक पालक म्हणूनही या उपायांवर आपले समाधान झाले नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच,जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध करत, मुलांशी प्रेमाने संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवण्याची गरज होती, असेही सुळे यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts