आता रक्त तयार होणार कारखान्यात

Oplus_16908288

हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत सिरीयस पेशंट आलं. त्याला रक्ताची गरज होती. मात्र योग्य रक्त गट मिळाला नसल्याने त्या पेशंटला आपला जीव गमवावा लागला. पण आता असं होणार नाही. कारण जपानमधील शास्त्रज्ञानी तयार केल आहे कृत्रिम रक्त.

रक्ताच्या तुटडवढ्यामुळे अनेक अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागेले. मात्र आता जपानमधील शास्त्रज्ञ हिरोमी सकाई यांच्या नेतृत्वाखाली टीमने कृत्रिम रक्त तयार करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यांनी कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला लगेच देता येईल असे ‘युनिव्हर्सल’ कृत्रिम रक्त विकसित केले आहे. या कृत्रिम रक्तला कोणताही रक्त गट नसतो. त्यामुळे रक्त कोणत्याही रक्त गटाचे आहे हें पाहावं लागत नाही.

तसेच, नैसर्गिक रक्त 42 टिकते. परंतु जपानने विकसित केलेले हे कृत्रिम रक्त सामान्य तापमानाला २ वर्षे आणि रेफ्रिजरेटरमध्ये ५ वर्षांपर्यंत साठवता येऊ शकते. सध्या या कृत्रिम रक्ताच्या मानवी चाचण्या सुरू असून त्या यशस्वी ठरल्यास २०३० पर्यंत हे तंत्रज्ञान प्रत्यक्ष उपचारांसाठी उपलब्ध होऊ शकतं.कृत्रिम रक्ताच संशोधन हें वैद्यकीय क्षेत्रात क्रांतिकारी ठरू शकतं. याबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.

Exit mobile version