
दिल्ली,दि 29 : बीजेपी खासदार कंगना राणावत हिने जेंनझीबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरही अभिजीत दिपके कडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे . अभिजीत दिपके याने म्हटले की, कंगना राणावत हिला कोणी गांर्भीयाने घेत नाही. तसेच, 24 तासात पुन्हा एकदा अभिजीत दिपकेने आंदोलनाचा मोठा इशारा देखील सरकारला दिला आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर इथं नीट पेपर लीकप्रकरणी आंदोलन करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि Gen Z आंदोलकांवर कंगनानं इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली आहे. या आंदोलकांना तिनं ‘जनरेशन गटार’असं संबोधलं होत.
कंगनानं केवळ आंदोलनावरच नव्हे, तर सहभागी झालेल्या तरुण-तरुणींच्या जीवनशैलीवर आणि पालकांच्या संगोपनावरही प्रश्न उपस्थित केले.तसेच,खरे स्वातंत्र्य हे स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवावं लागते. पालकांच्या पैशांवर जगून, जबाबदारी न स्वीकारता स्वातंत्र्याची भाषा करणं योग्य नाही, असंही कंगनानं म्हटलंय.