
पुणे, दि. 22 : इथॅनॉल मिश्रित पेट्रोलचे वाद मिटत नसतानाच आता इथॅनॉलची चूल आलेली आहे. एलपीजी सिलेंडरला पर्याय म्हणून आता इथॅनॉल मिश्रित चूल आली आहे.हा स्टोह इथॅनॉल आणि पाणी यांच्या मिश्रानावर चालतो.त्यामुळे तो एलपीजी गॅसपेक्षा स्वस्त मिळतो. त्याने स्वयंपाकाचा खर्च निम्याहून कमी होतो.
93% इथॅनॉल आणि 7% पाणी वापरून ही चूल चालते.इथेनॉलचा दर सुमारे ६० ते ७० रुपये प्रति लिटर असल्याने, एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत हा खूप स्वस्त पर्याय आहे. या स्टोह मधील इंधन लिक्विड स्वरूपात असल्याने एलपीजी गॅससारखा उच्च दाबाचा स्फोट होण्याचा कोणताही धोका नसतो.
या चुलीची खास गोष्ट म्हणजे यात धूर होत नाही आणि एलपीजीप्रमाणेच स्वच्छ, निळी व तीव्र आच मिळते. याशिवाय, ही चूल पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. इथेनॉल गहू, तांदूळ, मका आणि ऊस यांसारख्या पिकांपासून तयार होत असल्याने शेतकऱ्यांनाही याचा फायदा होऊ शकतो.
एका लिटर इथेनॉलवर ही चूल अनेक तास चालू शकते, त्यामुळे ती दैनंदिन वापरासाठीही उपयुक्त मानली जात आहे. आता e20 पेट्रोल नंतर इथॅनॉलची चुलीला लोक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचं आहे.