प्रधानमंत्र्यांनी आपली डिग्री सार्वजनिक करावी ; अभिजित दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया

Oplus_16908288

औरंगाबाद, दि. 3 : अलीकडच्या काही दिवसांत दिपके यांच्या कुटुंबाच्या संपत्तीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दिपके यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहेत.”आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी माझ्या वडिलांच्या संपत्तीबाबत उत्तर देईन,” असे वक्तव्य अभिजीत दिपके यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिपके म्हणाले,आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांनी डिग्री सार्वजनिक करावी. त्यानंतर मी माझ्या शैक्षणिक खर्चाच्या कर्जाचा सगळा तपशील जाहीर करेन. माझी पदवी खरी आहे. मी आशा करतो की, नरेंद्र मोदी यांची पदवीही खरी असेल, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले. ते सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, दिपके यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या विधानावर भाजपसह इतर राजकीय पक्षांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Exit mobile version