प्रधानमंत्र्यांना अपशब्द वापरणाऱ्या मुलीला बदलावं लागलं घर

Oplus_16908288

दिल्ली, दि. 4 : जंतरमंतर वरती झालेल्या आंदोलनामध्ये प्रधानमंत्रीना अपशब्द वापरलेल्या मुलीला माफीनंतरही बलात्कार आणि हत्येच्या धमक्या येत आहेत.त्यामुळे अल्पवयीन मुलीला आणि तिच्या आईला सुरक्षेच्या कारणास्तव तीनवेळा घर बदलावं लागलं आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव हे कुटुंब पहिल्यांदा नोएडा मधून फरीदाबादमध्ये नातेवाईकांकडे गेले.मात्र तिथेही धमक्या सुरूच राहिल्या.त्यामुळे त्यांना अज्ञात स्थळी जावे लागले. असे त्या मुलीचे वकील अनिल कुमार यांनी सांगितलं. सोशल मीडियावर मुलीबाबत पसरवल्या जाणाऱ्या अनेक दावेही त्यांनी फेटाळून लावले.

तक्रार दाखल झाली तेव्हा मुलगी केवळ 14 वर्षांची होती. 1 ऑगस्ट रोजीच ती 15 वर्षांची झाली असून, सध्या ती दिल्लीच्या ओपन स्कूलिंग प्रणालीतून दहावीचे शिक्षण घेत आहे, असं वकिलांनी नमूद केलं. पंतप्रधानांबद्दल वाट्टेल ते बोलणारी ही मुलगी 25 वर्षांची असून, सलून कर्मचारी असल्याचा आणि तिचे नाव ‘रुचिका’ असल्याचा दावा, सोशल मीडियावर केला जात आहे, पण हे सर्व दावे पूर्णपणे खोटे असल्याचं वकिलांनी स्पष्ट केलं.

तसेच, त्या मुलीची आई एकल पालक (सिंगल पॅरेंट) असून शिकवण्या घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. मात्र सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना वारंवार घर बदलावं लागत आहे, असंही वकिलांनी नमूद केलं. यापूर्वी संबंधित मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून देशवासीयांची सार्वजनिक माफी मागितली होती. पंतप्रधानांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केलेला नव्हता आणि आपल्या कृतीबद्दल तिला अत्यंत पश्चात्ताप होत आहे, असं तिने म्हटलं होतं.

Exit mobile version