बातम्या

प्रलंबित मागण्यासाठी निवासी डॉक्टरांचे आंदोलन आणखी तीव्र

मुंबई, दि. 6 : निवासी डॉक्टरांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन तीव्र केलं आहे. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील MD/MS/DNB निवासी डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार आहेत.सेंट्रल MARD ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं आहे.

नियमित OPD, IPD, वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक उपक्रम, सेंट्रल लॅब आणि फिव्हर OPDही बंद राहणार आहे. मात्र आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे. कॅज्युअल्टी, ट्रॉमा, ICU, लेबर रूम, आपत्कालीन शस्त्रक्रिया सुरू राहतील.

तसेच,इमर्जन्सी लॅब, ब्लड बँक आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. जीव वाचविणाऱ्या उपचारांची गरज असलेल्या कोणत्याही रुग्णाला सेवा नाकारली जाणार नाही असेही सांगण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts