
पुणे, दि 20 : लहान मुलांचं पॅन कार्ड काढता येत? हो लहान मुलांचं देखील पॅन कार्ड काढता येत. तुम्ही म्हणाला कि लहान मुलांचं कुठे पॅन कार्ड काढतात का? किंवा पॅन कार्डचा लहान मुलांना काय उपयोग तर,तुम्हाला मुलाच्या नावावर मोठी गुंतवणूक करायची असेल, बँक खाते किंवा सुकन्या समृद्धी योजना सुरू करायची असेल, किंवा त्याला नॉमिनी बनवायचं असेल, तर मायनर पॅन कार्ड खूप उपयोगी ठरतं. बाल कलाकार किंवा स्वतःचं उत्पन्न असलेल्या मुलांसाठीही पॅन कार्ड आवश्यक असू शकतं.
मायनर पॅन कार्डसाठी अर्ज पालकांना मुलाच्या वतीने करावा लागतो. यासाठी मुलाचं आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र आणि पालकांचे ओळख व पत्त्याचा पुरावा आवश्यक असतो.अर्ज करण्यासाठी NSDL (Protean) च्या अधिकृत वेबसाइटवर जा. Form 49A निवडा आणि Category मध्ये Minor हा पर्याय निवडा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा, त्यानंतर भारतीय पत्त्यासाठी ₹107 फी ऑनलाइन भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेली पावती जपून ठेवा.
विशेष म्हणजे, मायनर पॅन कार्डवर मुलाचा फोटो किंवा स्वाक्षरी नसते. साधारण १५ दिवसांत पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर पाठवले जाते. तुम्हांला ही माहिती कशी वाटली ते नक्की सांगा.












