राजकीय
राजकीय

अभिजीत दीपकेंना अटक करण्याची मागणी

दिल्ली, दि. 4 : सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात दिल्लीत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.फैजान अन्सारी असे तक्रारदार व्यक्तीचे नाव आहे. दीपके यांच्या सहकाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप फैजान यांनी केला आहे.

अन्सारी यांनी तक्रारीत म्हंटले आहे की,अभिजीत दीपके यांच्या सहकाऱ्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे. माझ्यावर पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हल्ला झाला. या संदर्भात पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे दीपके यांना तात्काळ अटक करावी, अशी माझी मागणी आहे’.

तसेच त्यांनी आंदोलनावेळी केलेल्या कारवाईवरून दिल्ली पोलिसांचं विशेष कौतुक केलं. मी दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि पोलिसांना सॅल्यूट करतो. त्यांनी दिल्लीतील वातावरण बिघडू दिले नाही. खरंतर दीपके स्वत:च्या हितासाठी सर्व करत आहेत, असाही आरोप त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts