देश विदेश

स्वदेशी आंदोलनाची आठवण करून देत प्रधानमंत्र्यांनी हातमाग उद्योगला बळकटी देण्याचा केले आवाहन

दिल्ली, दि. 7 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंस्टाग्रामवरून नवीन व्हिडिओ शेअर करत स्वदेशीचा संदेश दिला आहे. राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पूर्वसंध्येला स्वदेशी आंदोलनाची आठवण करून देत मोदींनी पारंपरिक विणकर समाजाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी नागरिकांनी हातमाग उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

मोदी म्हणाले,मित्रांनो, 7 ऑगस्ट 1905 हा दिवस आपण कधीही विसरू नये. याच दिवशी भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती. आत्मनिर्भर भारताची पायाभरणी याच आंदोलनातून झाली. ब्रिटिशांविरोधातील या लढ्यात संपूर्ण देश एकवटला होता.

गेल्या आठवड्यात आपण सर्वांनी फ्रेंडशिप डे साजरा केला. त्याच उत्साहाने 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनही साजरा करूया. हातमाग दिन साजरा करण्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक गरीब आणि विणकर कुटुंबाचा उत्साह वाढवणे. चला, अशा छोट्या कुटुंबांना सक्षम बनवूया. हातमाग दिनानिमित्त प्रत्येकाने काही ना काही हातमाग उत्पादन नक्की खरेदी करावे.’

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts