पुणे, प्रतिनिधी : आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे जन्मजात किंवा अपघातामुळे झालेल्या कानाच्या विकृतीवर प्रभावी उपचार शक्य झाले असून, पैठण येथील २२ वर्षीय तरुणाला अत्याधुनिक ऑरिक्युलर रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रियेमुळे नव्या आयुष्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.हेमंत (नाव बदलले आहे) या तरुणाच्या उजव्या बाजूचा कान जन्मतःच पूर्णपणे विकसित झाला नव्हता. त्यामुळे त्याला बालपणापासून सामाजिक, मानसिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागत होता. उपचाराच्या शोधात असताना त्याचा संपर्क सकाळ मराठा परिवार या सामाजिक संस्थेशी आला. संस्थेचे पंकज पाटील, नागनाथ म्हस्के आणि वैभव ढोकळे यांनी पुढाकार घेत त्याला योग्य वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. त्यांच्या प्रयत्नांतून पुण्यात अत्याधुनिक ऑरिक्युलर रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.उपचार प्रक्रियेदरम्यान सूर्या सह्याद्री हॉस्पिटलच्या युनिट हेड अमृता साने यांनी समन्वय, मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहकार्य करत उपचार यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या स्वतःच्या बरगडीतील कूर्चापासून (कॉस्टल कार्टिलेज) त्रिमितीय कानाचा सांगाडा तयार करून तो त्वचेखाली बसविला जातो. त्यामुळे नैसर्गिक आकाराचा बाह्य कान तयार होतो. ही प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म नियोजन, प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवी शल्यचिकित्सकांच्या कौशल्यावर आधारित असते.जन्मजात कानाची विकृती, अपघातात कान गमावलेले रुग्ण, भाजल्यामुळे कानाचे नुकसान झालेल्या व्यक्ती तसेच कर्करोगामुळे कान काढावा लागलेल्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया आशादायी पर्याय ठरत आहे.याबाबत माहिती देताना मान व मुखाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया तज्ज्ञ तथा केअर क्यूब कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राम पाटील म्हणाले, “कानाच्या विकृतीमुळे अनेक रुग्णांचा आत्मविश्वास कमी होतो. आधुनिक ऑरिक्युलर रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रियेमुळे नैसर्गिक दिसणारा कान तयार करणे शक्य झाले असून रुग्णांना नव्याने आत्मविश्वासाने जगण्याची संधी मिळत आहे. योग्य नियोजन, अनुभवी शस्त्रक्रिया टीम आणि रुग्णाचा सकारात्मक सहभाग यामुळे उत्कृष्ट परिणाम साधता येतात.”या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे कानाच्या विकृतीने त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाला असून, योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अशा विकृतींवर प्रभावी आणि आधुनिक उपचार उपलब्ध असल्याचा विश्वास अधिक बळकट झाला आहे.
आधुनिक शस्त्रक्रियेमुळे कानाच्या विकृतीवर मात; पैठणच्या तरुणाला मिळाला नव्या आयुष्याचा आत्मविश्वास
-
By admin - 7
- 0

Leave a Comment
Related Content
-
झेन झी बाबत केलेल्या वक्तव्यावर कंगनाला अभिजित दिपके कडून सडेतोड उत्तर
By admin 1 month ago -
डेंगूशी दोन हात करणारी लस भारताला मिळाली
By admin 1 month ago -
E20 नंतर आता इथॅनॉलची चूल
By admin 1 month ago -
बेंगलोर मेट्रोने प्रवास करताना नियम मोडल्यास भरावा लागेल हजारो रुपयांचा दंड
By admin 1 month ago -
अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
By admin 1 month ago -