शेतातील dp जळालाय ? तर,तुम्हालाही मिळणार नुकसान भरपाई

Oplus_16908288

तुमच्या शेतातील dp जळाला आहे? आणि महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी dp बसवला नाही. तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. महावितरणच्या नियमानुसार ग्रामीण भागातील शेतातील dp 48 तासात दुरुस्त करून किंवा बदलून देण बंधनकारक आहे. जर असं झालं नाही 48 तासात dp बसवला गेला नाही, तर त्यानंतरच्या प्रत्येक तासाला 50 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे आदेश आहेत.

इतकेच नाही, तर डीपी वेळेत न बदलल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास, ग्राहक आयोगाने यापूर्वी काही प्रकरणांमध्ये महावितरणला प्रतिदिन सुमारे १,२०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत.त्यामुळे शेतातील dp जळाला असेल तर रीतसर तक्रार करा. तक्रार क्रमांक जपून जपून ठेवा.आणि dp बसवण्यास उशीर झाला तर नुकसान भरपाई घ्यायला विसरुन नका.तुम्हाला ही माहिती कशी वाटली हें कमेंट मध्ये नक्की सांगा.

Exit mobile version