नागपुरात इथॅनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात आपचा एल्गार

Oplus_16908288

नागपूर : नागपुरात पेट्रोलमध्ये इथॅनॉलचे प्रमाण वाढवण्याच्या विरोधात आपने आंदोलन केले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यातच ताब्यात घेतले.

आंदोलना दरम्यान इथॅनॉल मिश्रित पेट्रोलच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.इथॅनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक भूषण ढाकुलकर यांनी यावेळी सांगितले की, हे आंदोलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नसून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची सक्ती करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आहे. ग्राहकांना इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलना दरम्यान नितीन गडकरी यांचे निवासस्थान महाल परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली.अखेरीस आंदोलकांना ताब्यात घेऊन परिस्थिती सुरळीत करण्यात आली.

Exit mobile version