खेळबातम्या

मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?

  • अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला
  • सामना किती वाजता सुरू होईल?
  • भारतात कुठे आणि कसा पाहाल मोफत?

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत आता अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. गतविजेता अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात विजेतेपदासाठी सामना होणार आहे. उपांत्य फेरीत फ्रान्सला २-० ने हरवून स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर अर्जेंटिनाने इंग्लंडला २-१ ने पराभूत करुन सलग दुसऱ्यांदा विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ८ संघांसह सुरू झालेल्या या सर्वात मोठ्या फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आता २ संघ आमनेसामने येणार आहेत. अर्जेंटिना-स्पेनचा अंतिम सामना तु्म्ही कधी अन् कुठे पाहू शकता, जाणून घ्या.

स्पेन आणि अर्जेंटिना फायनसाठी सज्ज

स्पेनने उपांत्य फेरीत फ्रान्सला हरवून १६ वर्षांनंतर फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पेनने शेवटचे २०१० च्या फिफा विश्वचषकात अंतिम फेरीत खेळले होते आणि सामना जिंकला होता. अर्जेंटिनाने इंग्लंडला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. स्पेनसाठी लॅमिन यमाल हा त्यांचा स्टार खेळाडू आहे, तर अर्जेंटिनासाठी मेस्सी ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारतीय प्रमाणवेळेनुसार हा महामुकाबला सोमवार, २० जुलै रोजी मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होईल. हा सामना अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला जाईल. स्थानिक वेळेनुसार, सामना १९ जुलै रोजी दुपारी ३:०० वाजता सुरू होईल.

प्रक्षेपण कुठे पाहता येईल?

भारतात, फिफा विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना टीव्ही आणि डिजिटल दोन्ही माध्यमांवर पाहता येईल. हा अंतिम सामना ZEE5 वर थेट प्रक्षेपित केला जाईल, जे भारतातील फिफा विश्वचषक २०२६ चे अधिकृत डिजिटल प्रसारक आहे. परंतु ZEE5 वर सामना पाहण्यासाठी सबस्क्रिप्शन पॅक असणे आवश्यक आहे. जिओ वापरकर्ते जिओ टीव्ही ॲपवर डीडी स्पोर्ट्सचे प्रक्षेपण पाहू शकतात. याचे प्रसारण युनाईट८ स्पोर्ट्स आणि युनाईट८ स्पोर्ट्स एचडी वर देखील केले जाईल.

मोफत सामना कसा पाहाल?

अतिरिक्त शुल्क न भरता सामना पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात, अंतिम सामना डीडी स्पोर्ट्सवर देखील उपलब्ध असेल, जो डीडी फ्री डिश आणि अनेक डीटीएच प्लॅटफॉर्मवर विनामूल्य पाहता येईल. डीडी स्पोर्ट्स जिओ टीव्हीसारख्या काही टीव्ही सेवा आणि प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना वेगळ्या सबस्क्रिप्शनशिवाय अंतिम सामन्याचा आनंद घेता येईल.

सर्वांच्या नजरा मेस्सी आणि यामालवर

अर्जेंटिना आणि स्पेन या दोन्ही संघांनी प्रभावी कामगिरी करत फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिनाने बाद फेरीमध्ये केप व्हर्दे, इजिप्त, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. दुसरीकडे, स्पेनने ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, बेल्जियम आणि फ्रान्सला पराभूत करून आपला उत्कृष्ट आक्रमण आणि मजबूत बचाव दाखवून दिला.

अर्जेंटिनासाठी विजेतेपद राखण्याची आणि सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते बनण्याची ही संधी आहे. जर त्यांनी असे केले, तर ब्राझिलनंतर असे करणारा तो दुसरा संघ ठरेल. ब्राझिलने १९५८ मध्ये विजेतेपद जिंकले होते आणि १९६२ मध्ये ते राखले होते. तर, स्पेनसाठी चॅम्पियन बनण्याची ही दुसरी संधी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts