Uncategorizedदेश विदेश

डेंगूशी दोन हात करणारी लस भारताला मिळाली

दिल्ली, दि. 22 : जीवघेण्या डेंगूचा ताप आता तिहासात जमा होणार. कारण डेंगू शी दोन हात करणारी पहिली लस देशाला मिळाली आहे. डेंगूमुळे आजपर्यंत कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र आता डेंग्यूविरुद्ध लढण्यासाठी देशातील पहिली अधिकृत लस मिळाली आहे.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने जपानच्या ताकेडा कंपनीच्या ‘क्युडेन्गा’ या लशीला मंजुरी दिली आहे.ही लस डेंगू च्या चारही प्रकारावर संरक्षण करते. ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.तसेच ही लस दोन डोस मध्ये दिली जाते आणि दोन्ही डोसमध्ये ३ महिन्यांचे अंतर असणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts