
मुंबई, दि 27: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.राज्य सरकारने एग्रीगेटर टॅक्सी सेवांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार राइड पूलिंग सेवा वापरण्यासाठी प्रवाशांना केवायसी म्हणजेच KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, महिला प्रवाशांना आता राइड पूलिंगमध्ये ‘महिलांसाठी महिला सहप्रवासी’ हा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिलांना अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणात प्रवास करता येईल.
याशिवाय, राइड बुक केल्यानंतर चालक किंवा कंपनी मनमानी पद्धतीने मार्ग बदलू शकणार नाही.मार्ग बदलायचा असल्यास सर्व प्रवाशांना आधी माहिती देऊन त्यांची संमती घेणे बंधनकारक असेल.तसेच चालक वेळेवर न पोहोचल्यास किंवा प्रवाशांनी कोणतेही योग्य कारण नसताना राइड रद्द केल्यास दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे.











