अमरावती

एफडीएकडून अमरावती विद्यापीठाच्या कँटीन कारवाई

अमरावती, दि. 31 : राज्यात तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया सुरूच आहेत. अमरावतीमधील (Amravati) संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज एफीडने धाड टाकत कारवाई केली आहे.

एफडीने तपासणीसाठी धाड टाकली असता, उपहार गृहात प्रचंड अस्वच्छता आणि अधिकृत परवानाशिवाय हे उपहा गृह सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर, येथील कँटीन सील करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी गजानन गोरे यांनी ही कारवाई केली.अमरावती विद्यापीठाची कँटीन आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची कँटीन पूर्णपणे बेकादेयशीर आणि विनापरवाना असल्याने तातडीची कारवाई करत दोन्ही उपहार गृहांना विभागाकडून टाळे ठोकण्यात आले आहेत.

दरम्यान, या कँटीनमधील अस्वच्छता आणि विनापरवानाच्या अनुषंगाने कारवाईबाबत अन्न व औषध प्रशासनाचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एफडीएकडून पत्र पाठवण्यात आलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

No Content Available