
पुणे, दि.2 : नीट पेपर फुटीमुळे आधीच भारतात वादात सापडलेल्या टेलिग्रामच्या अडचणीत भर पडली आहे.टेलिग्रामचे संस्थापक Pavel Durov यांच्या विरोधात रशियाने आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केले आहे. रशियाच्या एफएसबीने डुरोव यांच्यावर दहशतवादी कारवायांना मदत केल्याचा आरोप ठेवला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टेलिग्रामवरील काही चॅनेल, चॅट्स आणि बॉट्सचा वापर दहशतवादी आणि युक्रेनशी संबंधित गटांकडून हल्ल्यांचे नियोजन करण्यासाठी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रशियाने डुरोव यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टाकल्याचेही जाहीर केले आहे. मात्र, या आरोपांना राजकीय प्रेरणा असल्याचे डुरोव यांनी सूचित केले असून त्यांनी यापूर्वीही रशियन सरकारच्या दबावाला विरोध केला होता












