अहिल्यानगर

संगमनेरमध्ये पाकिस्तानी क्रीमचा अवैध साठा जप्त ; FDA ची धडक कारवाई

संगमनेर, दि. 3 : राज्यभरात FDA च्या धडक कारवाया सुरूच आहेत. मोहिमेत पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेल्या ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ चा बेकायदेशीर साठा संगमनेर मध्ये जप्त करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोल्डन मार्केटमधील एका दुकानावर टाकलेल्या छाप्यात सुमारे १२,९०० ते १४,००० रुपयांचा पाकिस्तान निर्मित क्रीमचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दुकानदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

तपासात या क्रीममध्ये विषारी पारा (Mercury) आणि शिसे (Lead) यांसारखे घातक घटक आढळल्याचे समोर आले. हे घटक त्वचेसह शरीराच्या इतर अवयवांसाठीही अत्यंत धोकादायक मानले जातात.FDA ने नागरिकांना विनापरवाना विक्री होणारी किंवा प्रतिबंधित विदेशी सौंदर्यप्रसाधने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. अशा क्रीमच्या वापरामुळे त्वचेचे गंभीर नुकसान, अॅलर्जी, तसेच मूत्रपिंडाच्या (किडनी) गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

No Content Available