सोलापूर

आषाढी वारीत सोलापूर एसटी विभागाचे विक्रमी उत्पन्न

सोलापूर,दि.3 :आषाढी वारीमध्ये सोलापूर एसटी विभागाला मोठा आर्थिक फायदा झाला आहे.यंदा सोलापूर विभागाने वारीत तब्बल २ कोटी ६१ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले असून, त्यामध्ये सोलापूर आगाराने ४३ लाख ८४ हजार रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.

एसटी प्रशासनाने नियमित सेवांबरोबरच मोठ्या प्रमाणात जादा बसेस आणि अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन केले होते. हजारो किलोमीटरच्या अतिरिक्त प्रवासामुळे वारकऱ्यांना वेळेत आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळाली, तर विभागाच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली.

आषाढी वारीदरम्यान प्रभावी वाहतूक नियोजन, प्रवाशांना दिलेली सुविधा आणि अतिरिक्त बससेवा यामुळे सोलापूर एसटी विभागाने सेवा आणि महसूल या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवले असून, यंदाची वारी विभागासाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरली.

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts