
रेशन वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुरक्षित करण्यासाठी कागदी रेशन कार्डला रामराम करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. रेशन वितरण पारदर्शक करण्यासाठी पारंपारिक रेशन कार्ड बंद करून क्यूआर कोड असलेले स्मार्ट रेशन कार्ड देण्यात येणार आहेत.
सध्या वापरात असलेली कागदी रेशन कार्डेही टप्प्याटप्प्याने स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांना या बदलाचा लाभ मिळणार आहे.नवीन स्मार्ट रेशन कार्डावर प्रत्येक लाभार्थ्यासाठी स्वतंत्र क्यूआर कोड छापण्यात येईल. रेशन दुकानात हा कोड स्कॅन करताच संबंधित लाभार्थ्याची माहिती काही क्षणांत उपलब्ध होईल. त्यामुळे ओळख पडताळणी आणि पात्रतेची तपासणी अधिक जलद आणि अचूकपणे करता येणार आहे.
तसेच प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद होणार असल्याने वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.हें कार्ड प्लास्टिकपासून बनवल जाणार आहे. त्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी आहे.
पुरवठा विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून, सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक विश्वासार्ह आणि आधुनिक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.












