
मुंबई, दि 15 : गेल्या काही दिवसापासून पावसाने राज्यात दडी मारली आहे. मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारवा जाणवण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानाकडून करण्यात आला आहे.18 ते 20 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या मुंबईसाठी हवामान विभागाकडून कोणताही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, मान्सूनच्या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.












