Uncategorized

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आदिवासी भागात भुलभूत सुविधांची आबाळ

रायगड, दि. 17 : जिंद सोनिपत मार्गांवर पहिली हायड्रोजन ट्रेन धावली. आमचा ऊर भिमानाने भरून आला. मात्र आजही भारतात अशी काही ठिकाण आहेत. जिथं मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत. आजही आदिवासी भागात लोकांना बेसिक सुविधांसाठी सुद्धा झगडावं लागतंय.

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरनेवाडी येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीपीडा सुरु झाल्या. रस्तेच नसल्याने रुग्णवाहिकेचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे ग्रामस्थांनी बांबू आणि चादरीच्या साह्याने झोळी करून डोंगर, दगड आणि पाण्याचे ओहोळ पार करत महिलेला सुमारे ६ ते ७ किलोमीटर अंतरापर्यंत खांद्यावरून रुग्णालयात नेलं.मनिषा पारधी असं गर्भवती महिलेचे नाव आहे.

मनीषाने एका सुदृढ बाळाला जन्म दिला.मात्र तिचा खडतर प्रवास इथेच थांबला नाही.प्रसूतीनंतर घरी परतताना देखील रस्ते नसल्यामुळे या बाळंतिणीला व तिच्या नवजात बाळाला पुन्हा एकदा झोळीचाच आधार घ्यावा लागला.त्यामुळे स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष होऊनही जर मूलभूत सुविधा मिळत नसतील तर प्रश्न नेमके कोणाला विचारायचे?

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts