सोनम वांगच्छुक यांची नेटवर्थ ऐकून थक्क व्हाल…

Oplus_16908288

दिल्ली, दि.18 : प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगच्छुक यांच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या उपोषणाचा आज २१ वा दिवस आहे. सगळा देश एकतर त्यांना सपोर्ट करतोय किंवा विरोधात बोलतोय. मात्र सोनम सध्या अजुन एका गोष्टीमुळे चर्चेत आहेत ते त्यांच्या साध्या राहणीमाणामुळे.

3 इडियट्स’मधील रँचोच्या प्रेरणास्थानी असलेलेसोनम वांगच्छुक हें फक्त त्यांनी लावलेल्या शोधासाठीच नाही तर तर त्यांच्या साध्या जीवनशैली साठी सुद्धा ओळखले जातात. सोनम यांच्याकडे आलिशान बंगला नाही, लक्झरी कार नाही किंवा चैनीचं जीवनही नाही.त्यांच्याकडे आहे ती वैयक्तिक संपत्ती अंदाजे ७५ लाख रुपये इतकीच.त्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत म्हणजे संशोधन, शैक्षणिक प्रकल्प, विविध व्याख्याने आणि त्यांचे ‘Wangchuk’s World’ हे यूट्यूब चॅनल. मात्र, कमाईचा मोठा भाग ते स्वतःवर खर्च न करता शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समाजहिताच्या उपक्रमांमध्ये गुंतवतात.

वांगच्छुक यांची खरी संपत्ती म्हणजे त्यांचे विचार आहेत. आजच्या काळात अनेक जण संपत्तीचा दिखावा करतात. पण सोनम वांगचुक यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की, खरी श्रीमंती बँक खात्यात नसते, ती आपल्या विचारांत आणि समाजासाठी केलेल्या कामात असते.त्यामुळेच ते लाखो तरुणानाचे प्रेरणास्थान आहेत.पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Exit mobile version