मार्च २०२७ पर्यंत एल निनोचा प्रभाव? NOAA चा मोठा इशारा

Oplus_16908288

पुणे, दि.24 : अमेरिकेच्या नॅशनल ओशॅनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) च्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या अहवालानुसार, सध्याचा एल निनो मार्च २०२७ पर्यंत कायम राहण्याची तब्बल ९७ टक्के शक्यता आहे.इतकेच नाही, तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत एल निनो अधिक तीव्र होण्याची ८१ टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सध्या विषुववृत्तीय मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले असून, हे एल निनो अधिक मजबूत होत असल्याचे संकेत मानले जात आहेत.तज्ज्ञांच्या मते, वर्षअखेरीस एल निनो आणखी तीव्र होऊ शकतो. त्याचा परिणाम भारतासह जगभरातील हवामानावर होण्याची शक्यता आहे.

यामुळे अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर, तसेच तीव्र उष्णतेच्या लाटा यांसारख्या टोकाच्या हवामान घटनांचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे नागरिक, शेतकरी आणि प्रशासनाने आगामी हवामानाच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Exit mobile version